हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली ; दिले ‘हे’ महत्वाचे कारण

Hassan Mushrif Guardian Minister। राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मोठ्या घटना घडताना दिसत आहे. काल धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दुसरे बडे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल यांच्याविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मुश्रीफांनी का सोडलं पालकमंत्री पद ? Hassan Mushrif Guardian Minister।
हसन मुश्रीफ हे सहावेळा आमदार राहिले आहेत. त्यातच यंदा मुश्रीफ यांच्याकडे फक्त तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले होते. कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री असलेले मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आले तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास 600 किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते. त्यामुळे कोल्हापूर या त्यांच्या मतदारसंघात त्यांना लक्ष देता येत नव्हते त्यामुळे त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणाकडे सोपवली जाणारा वाशिमच्या पालकमंत्री पदाची धुरा? Hassan Mushrif Guardian Minister।
महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही थांबलेला नाही. मात्र त्यातच आता हसन मुश्रीफांच्या निर्णयामुळे. वैद्यकीय शिक्षणमंत्री असलेल्या मुश्रीफ यांना वाशिमचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. पद सोडण्याची इच्छा त्यांनी दर्शवली असून त्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याशी चर्चासुद्धा केली असल्याचे समजते. त्यातच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री असलेले दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही, त्यामुळे वाशिमचं पालकमंत्री पदाची धुरा दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.





