Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मोठा दिलासा ! ईडीकडून ‘ते’ प्रकरण अधिकृतपणे बंद
कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या मुलाला ईडीने मोठा दिलासा दिला आहे.

Hasan Mushrif : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या मुलाला ईडीने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारत 2022 चा मनी लाँड्रिंगची केस अधिकृतपणे बंद केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मूळ गुन्हे आधीच रद्दबातल ठरवल्यामुळे मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई पुढे चालवणे शक्य नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष पीएमएलए न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी या प्रकरणावर निर्णय देताना स्पष्ट केले की, मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी मूळ गुन्हा असणे ही मुख्य अट असते. जेव्हा मूळ गुन्हाच उच्च न्यायालयाकडून रद्द केला गेला आहे, तेव्हा पीएमएलए अंतर्गत कारवाई अस्तित्वात राहू शकत नाही.
या निर्णयाच्या आधारे विशेष न्यायालयाने 4 एप्रिल 2022 रोजी दाखल केलेला अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल रद्द केला असून प्रकरणाची सर्व कागदपत्रे ईडी अधिकाऱ्यांकडे परत करण्याचे निर्देश दिले (Hasan Mushrif) आहेत.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावरील आरोप कंपनी नोंदणी कार्यालयाने मार्च 2022 मध्ये दाखल केलेली तक्रार आणि कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल झालेला एफआयआर या मूळ गुन्ह्यांच्या आधारे ईडीने हसन मुश्रीफ, त्यांची मुले आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात तपास सुरू (Hasan Mushrif) केला होता.






