Jan-Neta Movie : तामिळनाडूत सध्या थलपती विजयची हवा आहे. चित्रपटसृष्टीतून आता विजय राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याच्या टीव्हीके (TVK) पक्षाने तामिळनाडू विधानसभेत घवघवीत यश मिळवले आहे. सध्या सरकार स्थापनेच्या दृष्टीने तामिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. दुसरीकडे चाहत्यांना विजयच्या शेवटच्या जननेता या चित्रपटाची रिलीजची उत्सुकता आहे. विजयने राजकारणात येण्यापूर्वी आपला शेवटचा चित्रपट जननेता असल्याचे जाहीर केले होते. या चित्रपटावर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू होते. २०२५ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे सेन्सॅार बोर्डाच्या कात्रीतही चित्रपट अडकला आणि तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन सतत पुढे ढकण्यात येत आहे. ( Jan-Neta Movie) मात्र, आता चित्रपटाच्या रिलीजबाबात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, जननेता हा चित्रपट लवकरच रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. थलपथी विजयचा ५२ वा वाढदिवस २२ जून २०२६ रोजी असल्याने याच दिवशी जननेता हा त्याचा शेवटचा चित्रपट रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा चित्रपट या दिवशी रिलीज होणार की पुन्हा प्रदर्शन लांबणीवर पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (Jan-Neta Movie ) Jan-Neta Movie : थलपती विजयच्या शेवटच्या चित्रपटाची तारीख ठरली? महत्वाची अपडेट समोर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी ८ मे या दिवशी चित्रपट रिलीज होणार असल्याची चर्चा होती. पण तसे काही घडले नाही. त्यामुळे आता समोर आल्याने अपडेटनुसार विजयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जननेता रिलीज केला जाऊ शकतो. तथापि याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Jan-Neta Movie) हेही वाचा : Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांना पाहून विमानात लोकांनी ‘चोर, चोर, टीएमसी चोर’ म्हणून दिल्या घोषणा ; तृणमूल खासदार म्हणाल्या,” हा माझ्या..”