Trisha Krishnan : अफेरच्या चर्चांवर पहिल्यांदाच व्यक्त झाली त्रिशा; ‘त्या’ व्हिडिओवरुन टीका करणाऱ्यांना घेतलं फैलावर, कडक शब्दांत म्हणाली…
Trisha Krishnan : गेल्या काही दिवसांपासून थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता अभिनेत्री त्रिशाने टीका करणाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे.

Trisha Krishnan : नुकतेच एका कार्यक्रमात साऊथचा सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी एकत्र हजेरी लावली होती. दोघांचा एकत्रित असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी त्रिशावर टीका केली होती.
याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्रिशा यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच दोघांचा एकत्र व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता अफेअरच्या चर्चांवर त्रिशाने मौन सोडलं असून, टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.
तिने ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या अफेरच्या अफवांवर मौन सोडले आहे. तसेच त्रिशाने विजयसोबत कार्यक्रमात एकत्र उपस्थित राहण्याबाबतही सांगितले आहे.
काय म्हणाली त्रिषा?
“मला शेवटच्या क्षणी आयोजकांनी माझ्या सहाय्यकाद्वारे एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास सांगितले होते. मी शेवटच्या क्षणी सहभागी झाले. मायक्रोफोन एखाद्या व्यक्तीचे विधान बुद्धिमान किंवा विनोदी बनवत नाही. ते फक्त मूर्खपणा दाखवते. कोणत्याही माहितीशिवाय वापरलेले चुकीचे शब्द, जे एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असतात हे त्याच्यापेक्षा ते वापरणाऱ्याची नियत जास्त दाखवतात.” अशी प्रतिक्रिया पोस्टद्वारे देत अभिनेत्रीने नेटकऱ्यांना सुनावलं आहे.
थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या अफेअरच्या चर्चा
गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीतील स्टार कलाकार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरु होण्याअगोदर थलपती विजयवर त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याच्यावर एका अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. ज्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचे विजयसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एका कार्यक्रमात आले एकत्र
अफेअरच्या चर्चा रंगल्या असतानाच विजय आणि त्रिशा एका कार्यक्रमात एकत्र दिसल्याने त्यांच्यावर टीका सुरू झाली. दोघांचा एकत्रित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विजयने फुलांचा गुच्छ हातात घेतला, तर त्रिशाने पाहुण्यांशी हस्तांदोलन केले. विजय आणि त्रिशा नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढताना दिसले. ते एकत्र कार्यक्रमातून बाहेर पडले.





