भाजप कार्यालयाची तोडफोड
\nदरम्यान, शांतीपूरमधून मालमत्तेच्या नुकसानीचे वृत्त आले आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक भाजप कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे, डाव्या आघाडीशी संलग्न असलेल्या इंडियन सेक्युलर फ्रंट या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या एका पोलिंग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आहे.
\nभाजप उमेदवाराच्या गाडीची तोडफोड West Bengal Assembly Election:
\nदक्षिण २४ परगणा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विकास सरदार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या केशरी रंगाच्या मारुती बलेनोची मागची काच फुटली होती. पक्षाने यासाठी तृणमूल कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे.