Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला? मंत्री गिरीष महाजन यांनी थेट नावच सांगून टाकलं म्हणाले…

Girish Mahajan : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्री कोण होणार? याच्यावर बरीच चर्चा केली जात होती. आताही याबाबत चर्चा सुरूच आहे. काही केल्या या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. अशातच भाजपच्या एका मंत्र्याने नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मोठा दावा केला आहे.
नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार!
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाच्या पालकमंत्री म्हणून घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध झाल्याने एका दिवसातच त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. यामुळे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापर्यंत सुटलेला नसताना आता मंत्री गिरीष महाजन यांनी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या नेत्यांमध्ये रस्सीखेच
धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजन यांना हा दावा केला आहे. खरंतर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र, यामुळे आता गिरीष महाजन यांनी केलेल्या दाव्यामुळे पालकमंत्री रणकंदण सुरू होणार असल्याचं दिसतं आहे.
काल १६ अॅागस्ट राज्यात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. या सणानिमित्ताने आनंदादायी वातावरण पाहायला मिळालं. दहीहंडीच्या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. अशाच एका धुळ्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमाला मंत्री गिरीष महाजन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीष महाजन?
“पावसाने बऱ्याच दिवसापासून दडी मारली होती. मात्र, आता पावसाच्या आगमन झालेले आहे. पाऊस सुरू असून देखील दहीहंडीच्या उत्सवासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. मी दरवर्षी दहीहंडी उत्सवासाठी धुळ्याला येत असतो. नाशिकला देखील मी जात असतो, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होत आहे, असं मोठं विधान भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी केलं आहे.
हेही वाचा : किश्तवाडनंतर जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये ढगफुटी; चार जणांचा मृत्यू, रस्तेही खचले





