प्रभात वृत्तसेवा नीरा – अवैध वाहतूक करणाऱ्या उन्माद झालेल्या वाहनचालकांनी महसूल कर्मचाऱ्यावरच हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जेजुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुळुंचे येथे घडला. दोन जणांविरोधात जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे थोपटेवाडी हद्दीत अवैध क्रशर वाहतूक करत असलेल्या डंपरवर कारवाई करण्यासाठी जात असलेल्या महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी शरद मारूती लोंढे (वय ५१) रा. मांजरी बुद्रुक) यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याची घटना (दि.१०) दुपारी घडली. तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस हावालदार कदम करीत आहेत. आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना कोर्टासमोर हजार करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे.