Maharashtra Politics | रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. यादरम्यान आता महाराष्ट्र शासनाच्या 28 एप्रिल 2025 च्या परिपत्रकानुसार येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रायगडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे करणार झेंडावंदन करणार आहेत. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडवंदन करणार आहेत. यामुळे पालकमंत्रीपदाची माळ अदिती तटकरेंच्या गळात पडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. पण नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भूसे, तर रायगडसाठी शिंदेंचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत. Maharashtra Politics | रायगडमध्ये गोगयायावले यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याचे देखील दिसले होते. त्यामुळे महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. मात्र आता रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार ही चर्चा सुरु असताना महाजन आणि तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया तर दुसरीकडे, रायगडचं झेडावंदन आदिती तटकरे यांंच्याकडे दिल्यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिले असं नाही. मी रायगडचा मावळा आहे तलवार म्यान केलेली नाही,” असे स्पष्ट शब्दात गोगावले यांनी सांगितले. हेही वाचा: विवेक फणसळकर यांच्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘लेडी सिंघम’चे नावही स्पर्धेत आघाडीवर