‘या’ राज्यातही राबवली जाणार ‘लाडक्या बहिणी’ सारखी योजना, महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार

चंदीगड – हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी २ लाख ५ हजार १७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी १.८९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पात १३.७% म्हणजेच सुमारे १६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
यावेळी सैनी यांनी मैथिलीशरण गुप्त यांची हम क्या थे, क्या हो गए, हम क्या थे क्या हो गए और क्या होंगे अभी, आओ विचारो मिलकर ये समस्याएं सभी. ही कविता वाचून दाखवली जेणेकरून तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवता येईल.
नायब सैनी म्हणाले की, राज्यात लाडो लक्ष्मी योजना सुरू केली जाईल. महिलांना दरमहा २१०० रुपये दिले जातील. यासाठी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
- हरियाणाला पंजाबमधून एसवायएल कालव्याद्वारे वाट्याचे पाणी
- हिसार विमानतळावरून अयोध्या, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, जम्मूसाठी लवकरच विमान सेवा
- ५०० नॉन एसी, १५० एचव्हीएसी आणि ३७५ इलेक्ट्रिक बस खरेदी करणार.
- गुरुग्राममधील मिलेनियम सिटी सेंटरपासून सायबर सिटीपर्यंत २८.५ किमी लांबीची मेट्रो लाइन
- सर्व प्रमुख शहरांमध्ये बहु-स्तरीय पार्किंग बांधले जाईल.
- ऑलिंपिक विजेत्याला जिल्ह्यात क्रीडा अकादमी उघडण्यासाठी ५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणार
- विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरवर्षी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती
- राज्यात ७५० हरित स्टोअर्स आणि ३५० नवीन विटा बूथ उघडले जातील.
- डंकी मार्गाने तरुणांच्या जीवनाशी होणारी छेडछाड रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार





