#video : गणरायाच्या पालखीला हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकारांचा खांदा : भाविकांमध्ये जल्लोष

Updated On:

इंदापूर (नीलकंठ मोहिते) : इंदापूरच्या राजकारणात विळ्या- भोपळ्याचे नाते परिचित असलेल्या, भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर अवघ्या पंधरा दिवसात, दोन वेळा गणरायाच्या उत्सवानिमित्त एकत्र येत चर्चेचा माहोल तयार करून ठेवला आहे.

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यातील पालखीला चक्क दोघांनी खांदा देत,इंदापुरातील गणरायाची पालखी पुढे नेली. त्यामुळे इंदापूर शहरातील नगर परिषदेची पालखी दोघांच्या माध्यमातून पुढे जाणार का ? अशी चर्चा रंगली आहे.

इंदापूर नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे.यातच माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहराच्या विकासासाठी कोठ्यावधी रकमेचा निधी देऊन,राष्ट्रवादी काँग्रेसचा करिष्मा निर्माण केल्याचे चित्र आहे.

असे असतानाच,चक्क भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी कधी नव्हे इतक्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची पालखी आगामी काळात हर्षवर्धन पाटील प्रदीप गारटकर एकत्र खांदा देत पुढे नेतील की काय हे काळच ठरवेल.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

2026-10-08 07:37:51

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

Indapur : दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

2026-10-08 07:28:41

Indapur :  दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

2026-10-07 10:29:35

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव