Harshit Rana : हर्षितची ‘ती’ एक चूक भारताला पडली महागात! फिलिप्सला मिळालं जीवदान आणि कीवींनी फिरवला सामना

Harshit Rana mistake dropped Phillips catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने सुरुवातीला वर्चस्व गाजवूनही मधल्या षटकांत पकड गमावली. याला कारणीभूत ठरली ती क्षेत्ररक्षणातील एक मोठी चूक. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ग्लेन फिलिप्सचा एक सोपा झेल सोडला, ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला सोसावा लागला.
हर्षित राणाची चूक पडली महागात –
न्यूझीलंडच्या डावातील २६ वे षटक नितीश रेड्डी टाकत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने ‘पुल शॉट’ मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उडाला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणाऱ्या हर्षित राणाकडे हा झेल टिपण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, हर्षितने चेंडूकडे धाव घेण्यास थोडा उशीर केला. शेवटच्या क्षणी त्याने डायव्ह मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण चेंडू त्याच्या हातापासून थोडा दूर राहिला.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) January 18, 2026
फिलिप्स-मिचेलने न्यूझीलंडला सावरले –
विशेष म्हणजे, ज्यावेळी हे घडलं, तेव्हा फिलिप्स अवघ्या १८ धावांवर खेळत होता. जीवदान मिळाल्यानंतर फिलिप्सने कोणतीही चूक केली नाही आणि डॅरिल मिचेलला साथ देत आपले शतकी खेळी साकारली. त्याने ८८ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ३ षटकार ठोकत १०६ धावांची वादळी खेळी साकारली. ज्यामुळे न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येकडे कोच करता आली.
सुरुवातीचा दबाव राखण्यात टीम इंडिया अपयशी –
कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी या निर्णयाचे स्वागत करत स्वप्नवत सुरुवात केली. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हर्षित राणाने डेव्हॉन कॉनवेला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच ५८ धावांवर विल यंगच्या रूपाने कीवींना तिसरा धक्का दिला.
हेही वाचा – Daryl Mitchell : टीम इंडियासाठी ‘व्हिलन’ ठरतोय डॅरिल मिचेल! सलग दुसरं शतक ठोकत मोडला सलमान बटचा विक्रम
मात्र, या सुरुवातीच्या धक्क्यांनंतर भारतीय गोलंदाज कीवी फलंदाजांवर दबाव कायम ठेवू शकले नाहीत. डॅरिल मिचेलने सलग दुसरे शतक ठोकले, तर जीवदान मिळालेल्या फिलिप्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र यानंतर ग्लेन फिलिफ्स (१०६) आणि डॅरिल मिचेलने (१३७) चौथ्या विकेट्साठी २१९ धावांची विक्रमी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने ८ बाद ३३७ धावांचा डोंगर उभारला.





