India vs Australia 1st Test : टीम इंडिया पर्थ कसोटीसाठी तयारी करत आहे. विराट कोहली आणि केएल राहुलसह सर्व खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार होऊ शकतो. भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णाही प्रबळ दावेदार आहे. हर्षितबदल बोलायचे झाले तर त्याची उत्कृष्ट कामगिरी देशांतर्गत सामन्यांमध्ये दिसून आली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 बळी घेतले आहेत. हर्षितची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात 45 धावांत 7 विकेट्स घेणे. त्याने लिस्ट ए मध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. आता तो टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करू शकतो. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हर्षितला खूप जवळून पाहिले आहे. त्यामुळे ते हर्षितवर विश्वास व्यक्त करू शकतात. त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. कृष्णाही पर्थ कसोटीचा दावेदार टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. यासोबतच हर्षित किंवा प्रसिद्ध कृष्णाची निवड होऊ शकते. प्रसिध्द कृष्णाचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 2 विकेट घेतल्या आहेत. कृष्णाने 21 प्रथम श्रेणी सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत. Border-Gavaskar Trophy 2024/25 : केएल राहुलने दुखापतीबाबत स्वत: दिले अपडेट; जाणून घ्या, पर्थ कसोटीत खेळणार की नाही…. टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियातील वेळापत्रक… भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 30 नोव्हेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे. चौथ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होणार आहे. शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.