Harshwardhan Sapkal : ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक-आर्थिक हानी : हर्षवर्धन सपकाळ
Harshwardhan Sapkal : चित्रपटसृष्टी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
Harshwardhan Sapkal : मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि येथील चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे. ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी आहे. (Harshwardhan Sapkal)
तुरुंगात बसून गुंड जर थेट चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील, तर पोलीस यंत्रणा नेमकी करतेय काय? सत्ताधाऱ्यांच्या अभय आणि राजकीय पाठबळाशिवाय या गुंडांची एवढी हिंमत वाढणे अशक्य आहे. असे टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Harshwardhan Sapkal)
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर आता संपूर्ण चित्रपटसृष्टीत भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये नुकतेच ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेथेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहित सुरक्षा मिळण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Harshwardhan Sapkal)
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मुंबईत दिवसाढवळ्या कलाकारांवर होणारे हल्ले आणि अंडरवर्ल्डच्या वाढत्या धमक्यांमुळे संपूर्ण बॉलिवूड दहशतीखाली वावरत आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनला थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी करावी लागणे ही महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची अत्यंत लाजीरवाणी शोकांतिका आहे. (Harshwardhan Sapkal)
या गंभीर परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यास देवेंद्र फडणवीस पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत, तर विरोधकांचा आवाज दाबण्यात पटाईत असलेले अमित शहा या गँगस्टर आणि गुंडांवर वचक निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. (Harshwardhan Sapkal)
कलाकारांवर गोळीबार होत असताना आणि बॉलिवूड मुंबई सोडून पलायन करण्याच्या तयारीत असताना, हे नेते सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावून बसले आहेत. जर राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे त्यांना जमत नसेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (Harshwardhan Sapkal)


