‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्राने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर; म्हणाली “कोणाच्याही कुटुंबाबद्दल..”

मुंबई – ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. आजही तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या हर्षाली मल्होत्रा अर्थात मुन्नी सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
मात्र एका नेटकऱ्याने तिच्या कुटुंबाचा उल्लेख करत तिची तुलना बाल कलाकार रुहानिका धवनशी केली होती. हे पाहून हर्षाली चांगलीच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तिने ट्रोल करणाऱ्यांना देखील सडेतोड उत्तर दिले आहे. नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले होते की, “मला एक गोष्ट समजत नाही, लोकांना या मुलीमध्ये काय दिसतं? चांगली दिसत नाही, चांगला अभिनय येत नाही, फक्त दुसऱ्यांची कॉपी करते. आधी रुहानिकाचे यूट्यूब चॅनल बघून तिनेही चॅनल सुरू केले, मग कथ्थक, मग ती जे काही करते, तेच सगळं ही कॉपी करते. हिचे स्वतःचं काहीच अस्तित्व नाही, फक्त लोकांची कॉपी करून वाईट जीवन जगतेय. हिला व तिच्या कुटुंबाला फक्त दुसऱ्यांचा द्वेष करणं आणि कॉपी करणे येते. सुधार आता तरी, अभिनय करणे तुला जमणार नाही.”
View this post on Instagram
यावर हर्षालीने प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “कोणाच्याही कुटुंबाबद्दल बोलणाऱ्यांनो लाज तुम्हाला वाटली पाहिजे. तुमच्या कमेंट्सवरूनच तुमचे स्टँडर्ड्स कळते. हिंमत नसल्याने फेक अकाउंट बनवून फक्त कमेंट्स करता येते. आणि रुहानिकाबद्दल बोलायचं झाल्यास तिने कथक किंवा युट्यूबचा कॉपीराइट घेतला आहे का? की दुसरं कोणीही ते करू शकत नाही.” असे सवालही तिने केला आहे. दरम्यान, हर्षाली मल्होत्रा 2015 मध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले गेले होते. मात्र, त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.




