‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाला 9 वर्ष पूर्ण; निर्मात्यांनी शेअर केला खास व्हिडिओ

Bajrangi Bhaijaan Completes 9 Years| बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘मुन्नी’ हे पात्र साकारलेल्या हर्षाली मल्होत्राने सर्वांची मनं जिंकून घेतली होती. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही व्हिडिओ शेअर केले आहेत.
सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगच्यावेळचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा सीन दाखवण्यात आला आहे. यात तो करीना कपूर आणि हर्षाली मल्होत्रासोबत शूटिंग करताना दिसतो. याशिवाय चित्रपटातील गाण्यांच्या शूटिंगची झलकही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. नेटकरी कमेंट करत या चित्रपटाविषयी प्रेम व्यक्त करत आहेत. Bajrangi Bhaijaan Completes 9 Years|
View this post on Instagram
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठेकलेक्शन केले आणि 2015 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला. या चित्रपटाने भारतासहित जगभरात ९६९ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान खान, करीना कपूर आणि हर्षाली मल्होत्रा यांच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, शरत सक्सेनासारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. यानंतर चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. Bajrangi Bhaijaan Completes 9 Years|
हेही वाचा:



