Jasprit Bumrah : ‘त्याने किती कष्ट सोसलं माहित आहे का…’, हर्षा भोगलेंनी बुमराहवर टीकाकारांना सुनावलं

विशेष म्हणजे, भारतीय संघाने ज्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला, त्या दोन्ही सामन्यांमध्ये बुमराह खेळला नव्हता. याच मुद्द्याचा आधार घेत काहींनी बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्याचा आधार घेत काहींनी बुमराहला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने सर्व पाच कसोटी सामने खेळले आणि मालिकेत सर्वाधिक षटके टाकली. सिराजच्या उदाहरणाचा दाखला देत बुमराहवर टीका करण्यात आली.
हर्षा भोगलेंनी टीकाकारांना फटकारले –
Really?? Trolling Bumrah? Hope you aren’t among those but If you are, fair to say you have no idea of what you have to endure to become a Bumrah. And you have no appreciation for one of India’s greatest matchwinners who, as it turns out, bowls more overs than almost any other…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 7, 2025
प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले यांनी बुमराहच्या टीकाकारांना चांगलेच सुनावले. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत लिहिले, “खरंच? तुम्ही बुमराहला ट्रोल करत आहात? मला आशा आहे की तुम्ही अशा लोकांपैकी नाहीत. पण जर तुम्ही असाल, तर हे स्पष्ट आहे की बुमराह बनण्यासाठी त्याने किती कष्ट सोसले याची तुम्हाला काहीच कल्पना नाही. तुम्ही भारताच्या सर्वात मोठ्या मॅचविनर गोलंदाजाची प्रशंसा करत नाहीत. बुमराह हा असा गोलंदाज आहे, जो इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त षटके टाकतो.”
बीसीसीआयचा वर्कलोड मॅनेजमेंटसाठी नवा नियम –
पीटीआयच्या अलीकडील अहवालानुसार, बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंटसाठी एक नवा आणि कठोर नियम आणण्याच्या तयारीत आहे. बोर्डाने खेळाडूंना स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे खेळाडू स्वतःहून कोणता सामना खेळायचा आणि कोणत्या सामन्यात विश्रांती घ्यायची हे ठरवू शकणार नाहीत.
हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीचा नवा लूक पाहून चाहते हैराण, वनडे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!
आता खेळाडूंच्या वर्कलोडचे व्यवस्थापन संघ व्यवस्थापन आणि निवड समिती करेल. कोणता खेळाडू कोणता सामना खेळेल आणि कोणत्या सामन्यात विश्रांती घेईल, हे देखील संघ व्यवस्थापन आणि निवड समितीच ठरवेल. या नव्या नियमामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर आणि त्यांच्या दीर्घकालीन फिटनेसवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.





