Virat Kohli : किंग कोहलीचा नवा लूक पाहून चाहते हैराण, वनडे निवृत्तीच्या चर्चांना उधाण!

कोहलीच्या लूकने चाहते हैराण –
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत कोहलीची दाढी पूर्णपणे पांढरी झालेली दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची ती चमक आणि डोळ्यांमधील तो तडफदारपणा दिसत नाही, ज्यामुळे तो मैदानावर ‘गरजणारा’ कोहली म्हणून ओळखला जातो. हा नवा अवतार पाहून चाहत्यांचं मन सुन्न झालं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आहे, तर काहींनी कोहली कसोटी आणि टी-20 नंतर आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
Virat Kohli spotted in London — white beard, tired eyes, and a fire that’s slowly dimming. 💔 pic.twitter.com/xmaVfR3KRJ
— Dinda Academy (@academy_dinda) August 8, 2025
कोहलीचं निवृत्तीचं वक्तव्य आठवलं –
8th July 2025 – 8th August 2025 🥲🥲
Virat Kohli – “You know it’s time when you are colouring your beard every four days”. 💔#ViratKohli pic.twitter.com/Y4lBRywt6k
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) August 8, 2025
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना सोशल मीडियावर लिहिलं होतं, “जेव्हा तुम्हाला दर चौथ्या दिवशी दाढी रंगवावी लागते, तेव्हा समजून जा की तुमचा वेळ आला आहे.” त्याचं हे वक्तव्य आता त्याच्या नव्या लूकमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. चाहत्यांना वाटतंय की कोहलीचं हे वक्तव्य त्याच्या निवृत्तीच्या मानसिकतेचं द्योतक आहे.
वनडे क्रिकेटमधील पुढील पाऊल –
विराट कोहलीने 2024 च्या टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर आयपीएल 2025 च्या मध्यात त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये तो खेळत आहे आणि 2027 च्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्याची त्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे.
चाहत्यांच्या अपेक्षा कायम –
कोहली आता ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत मैदानात उतरणार आहे. ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल. कोहलीच्या या नव्या लूकमुळे चाहते चिंतेत असले तरी त्याच्याकडून मैदानावरील धमाकेदार कामगिरीची अपेक्षा कायम आहे. कोहलीचा हा नवा अवतार त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर कसा परिणाम करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.





