हर्षवर्धन सपकाळ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा स्वीकारणार कार्यभार…

Maharashtra Congress Politics | विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. यानंतर आता काँग्रेस पक्षाने नव्याने बांधणी करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. अलीकडेच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर आज मंगळवारी 18 फेबुवारी हर्षवर्धन सपकाळ मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजता ते पदभार स्वीकारणार असून बिर्ला मातोश्री सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ते पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यासारख्या बड्या नेत्यांची नावे चर्चेत होती. यापैकी एखाद्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद मिळेल, याची अनेकांना खात्री होती. मात्र, राजकीय लाईमलाईटपासून दूर असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. Maharashtra Congress Politics |
नाना पटोले यांनी चार वर्षे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Maharashtra Congress Politics |
हेही वाचा:
PM मोदींकडून शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे एअरपोर्टवर स्वागत; दोन दिवसीय भारत दौरा ठरणार महत्वाचा





