‘या’ गोष्टीची हर्षवर्धन पाटलांना वाटते भीती
Updated On:

पुणे : देशात आणि राज्यात आता कोणतीही लाट नाही. त्यामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी चांगले वातावरण आहे. मात्र, आता आम्हाला ईव्हीएम मशीनची भीती आहे. अशी भीती काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परीषदेत व्यक्त केली.
शहर आणि ग्रामीण भागात आघडीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळतील असे दाखविले जात आहे. त्यामुळे आता आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएमची भीती आहे. तसेच आम्हाला मतदान केंद्रावरही बारीक लक्ष ठेवावे लागणार असून निवडणुका पारदर्शक होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





