Harmanpreet Kaur Captaincy : रोहित-धोनीलाही न जमलेला पराक्रम आज हरमनप्रीत पाकिस्तानविरुद्ध करणार, नेमका आहे काय? जाणून घ्या
Harmanpreet Kaur Captaincy : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी पाकिस्ताविरुद्धचा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.

Harmanpreet Kaur 150th T20I Match As Captain Womens Asia Cup 2026 IND vs PAK : महिला आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणारा हायव्होल्टेज सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरणार आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल टाकताच हरमनप्रीतच्या नावावर जागतिक क्रिकेटमधील एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद होईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट जगतात आजवर कोणत्याही कर्णधाराला न जमलेली अद्वितीय कामगिरी हरमनप्रीत साध्य करणार आहे.
१५० सामन्यांत नेतृत्व करणारी जगातील पहिली कर्णधार ठरणार – Harmanpreet Kaur Captaincy)
हरमनप्रीत कौर २०१२ पासून भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत असून आतापर्यंत तिने १४९ टी-२० सामन्यांत भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच ती कर्णधार म्हणून १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याचा जागतिक टप्पा गाठेल. अशी किमया करणारी ती जगातील पहिलीच क्रिकेट कर्णधार ठरेल. तिच्या नेतृत्वाखाली भारताने ८७ विजय मिळवले असून ५७ पराभव आणि ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. तिच्या पाठीमागे श्रीलंकेची चामरी अटापट्टू (१२१ सामने) दुसऱ्या स्थानी आहे. (Harmanpreet Kaur Captaincy)
कर्णधारपदासोबत फलंदाजीतही दबदबा; ३३०१ धावांचा डोंगर – (Harmanpreet Kaur Captaincy)
𝐓𝐡𝐞 𝐟𝐢𝐱𝐭𝐮𝐫𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐧𝐞𝐞𝐝𝐬 𝐧𝐨 𝐡𝐲𝐩𝐞. 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐯𝐬 𝐏𝐚𝐤𝐢𝐬𝐭𝐚𝐧 🇮🇳🇵🇰
History favours the Women in Blue but Fatima Sana’s Pakistan will have other plans. Who takes bragging rights tonight? 🤔#DPWorldWomensAsiaCup2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/5kgv5plc3L
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 5, 2026
केवळ नेतृत्वच नव्हे, तर फलंदाज म्हणूनही हरमनप्रीतने आपल्या कामगिरीची ठसा उमटवला आहे. कर्णधार असताना तिने १३६ डावांत ३२.६८ च्या सरासरीने ३३०१ धावा कुटल्या आहेत, ज्यात १ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. दबावाच्या क्षणी आघाडीवरून लढण्याची तिची वृत्ती भारतीय महिला संघाला जागतिक स्तरावर अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारी ठरली आहे.
पाकिस्तानविरुद्ध १६ सामने; स्मृती मानधनासमोर मितालीला मागे टाकण्याची संधी – (Harmanpreet Kaur Captaincy)
𝐓𝐡𝐞 𝐫𝐢𝐯𝐚𝐥𝐫𝐲 𝐰𝐫𝐢𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐜𝐡𝐚𝐩𝐭𝐞𝐫 𝐭𝐨𝐧𝐢𝐠𝐡𝐭 👌#DPWorldWomensAsiaCup2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/gJVMzTNOzf
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 5, 2026
पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीतने आतापर्यंत १६ सामन्यांत २३० धावा केल्या आहेत. या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम मिताली राजच्या (३१५ धावा) नावावर आहे. मात्र, या सामन्यात स्मृती मानधनाकडे हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल. स्मृतीच्या नावावर सध्या ३०७ धावा असून, अवघ्या ९ धावा करताच ती पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारी अव्वल भारतीय महिला फलंदाज बनेल.





