Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरचा पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विक्रम! शफाली वर्माला मागे टाकत बनली नंबर-१

Harmanpreet Kaur record : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ चा बिगुल वाजला असून, पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीतने डब्लूपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
शफाली वर्माचा मोडला विक्रम –
या सामन्यापूर्वी हरमनप्रीतला हा विक्रम करण्यासाठी काही धावांची आवश्यकता होती. तिने २० धावांची खेळी करताच शफाली वर्माला (८६५ धावा) मागे टाकले. हरमनप्रीतच्या नावावर आता डब्लूपीएलमध्ये ८७१ धावा जमा झाल्या असून, ती या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे.
Innings Break!
6⃣9⃣ runs from the last 6⃣ overs for Mumbai Indians, courtesy of Sajeevan Sajana and Nicola Carey 👏💙
Nadine de Klerk with 4⃣ wickets 🔝
Scorecard ▶️ https://t.co/IWU1URl1fr#TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/zrd9NUTgUS
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
डब्ल्यूपीएल मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाज:
- हरमनप्रीत कौर: ८७१ धावा
- शफाली वर्मा: ८६५ धावा
- स्मृती मानधना: ६४६ धावा
- ऋचा घोष: ६२५ धावा
मुंबई इंडियन्सची झुंजार फलंदाजी –
डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात खराब झाली, लॉरेन बेलच्या गोलंदाजीसमोर अमेलिया केर आणि सिव्हर ब्रंट स्वस्तात बाद झाल्या. मात्र, कर्णधार हरमनप्रीत (२०) आणि जी. कमलिनी (३२) यांनी डाव सावरला. अखेरच्या षटकांत सजीवन सजनाने ४५ आणि निकोला कॅरीने ४० धावांची फटकेबाजी केल्यामुळे मुंबईने २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली.





