नगर, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद, पंचायत समिती दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासाचा काना आहे. यांच्या निवडणूका न घेतल्याने सरपंच, उपसरपंच सर्व सदस्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. अधिकारी काम करत नाही, इंजिनिअर गावात येत नाहीत, अनेक अडचणीला सामोरे जात आहे. येथील निवडून आलेले पदाधिकारी व ग्रामस्थ सर्व त्रस्त झालेले आहेत. स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी विकास कामांकडेही लक्ष देत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचा निवडणूक कार्यकाल संपून गेला आहे. काही संस्थांना तब्बल पाच वर्ष पूर्ण झालेले आहे. तरीपण राज्याचे सरकार व निवडणूक आयोग या संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल न करता फक्त पाहण्याचे काम करत आहे. पण सदर निवडणुका न घेतल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरीब जनतेमध्ये मोठे नैराश्य निर्माण झालेले आहे. कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद या मार्फत ग्रामीण भागामध्ये विकास कामे होताना दिसत नाहीत. आणि सामान्य माणूस हा मोठ्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचू शकत नाही. गावात येण्यासाठी ग्रामसेवकाला वेळ नाही, ते चार गावांना जोडलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काम करावे लागते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असल्या मुळे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना गावातील सर्व ग्रामस्थांना संपर्क करून काम करता येत होतं ही सिस्टीमच बंद असल्यामुळे गावाचे नुकसान होत आहे. लोकसभे नंतर विधानसभा या सर्व निवडणूका निवडणूक आयोग, सर्व नेते मंडळी स्वतः च्या निवडणूका पूर्ण करीत आहेत, पण जनसामान्यातला कार्यकर्ता हा पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्तरावर जाण्यापासून अनेक दिवसांपासून वंचित राहिलेला आहे. त्याचा कोणताही रस्ता दिसत नाही. या सर्व गोष्टींकरिता किती दिवस वाट पाहण्यात वेळ जाणार आहे, माहित नाही. शेतकर्यांचा प्रश्न दूध, कांदा, रस्ते, वीज वेळेवर नाही अनेक प्रश्नाला तोंड शेतकर्यांना या ठिकाणी द्यावे लागतं आणि सामान्यतः सामान्य पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पदाधिकारी या छोट्या आणि राज्यसंस्थेमार्फत अनेक प्रकारचे काम या ठिकाणी मिनी आमदारकी समजून पूर्ण होते, त्यामुळे स्थानिक स्वाराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरात लवकर् घ्यावा, अशी मागणी ही होत आहे. ग्रामीण भागात विकास कामांना खीळ बसली आहे. शेतकर्यांच्या वाडीवस्तवर जाणारे छोटे-छोटे रस्ते, त्या रस्त्यांना मुरूम टाकणे, पथदिवे लावणे, सोलर दिवे लावणे, कुट्टी मशीन, शिलाई मशीन, मुलांच्या सायकली वाटप, अशी अनेक प्रकारची कामे बंद आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने ग्रामीण भागात विकास कामे होईनात. जालिंदर कदम उपसरपंच आदर्श गाव मांजरसुंबा