षटकार मारल्यानंतर फलंदाजाला आला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच सोडले प्राण, VIDEO व्हायरल

Punjab cricketer dies of heart attack : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गुरुहरसहाय विधानसभा क्षेत्रात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून सोडले. डीएव्ही शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना ४९ धावा करणाऱ्या हरजीत सिंग या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच मृत्यू झाला. या दु:खद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हरजीत सिंगचे अंतिम क्षण कैद झाले आहेत.
षटकार मारल्यानंतर बसला खाली –
माहितीनुसार, हरजीत सिंग सकाळी क्रिकेट सामन्यात फलंदाजी करत होते. पांढरा आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या हरजीतने एक शानदार षटकार मारला, ज्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला. परंतु, त्यानंतर अचानक तो मैदानावर बसले. सहकारी खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटले की कदाचित थकव्यामुळे तो बसला असावा. पण काही क्षणांतच हरजीत छातीत दुखत असल्याने मैदानावर पडला आणि बेशुद्ध झाला. सहकारी खेळाडूंनी तात्काळ त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या श्वासोच्छवास थांबला होता.
डॉक्टरांनी केले मृत घोषित –
ख़ौफ़नाक दृश्य।
पंजाब के फिरोजपुर में क्रिकेट खेलते वक़्त एक खिलाड़ी ने जैसे ही ज़बरदस्त छक्का मारा,
अचानक दिल का दौरा पड़ा और उसी मैदान पर दम तोड़ दिया।ज़िंदगी वाकई पल भर की मेहमान है… 🕯️#Firozpur #HeartAttack #Cricketer pic.twitter.com/AsM3evT01T
— Ankit Rajput (@AnkitKu50823807) June 29, 2025
हरजीतला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. पेशाने सुतार असलेला हरजीत सिंग आपल्या सक्रिय जीवनशैली आणि क्रिकेटच्या प्रेमासाठी ओळखला जात होता. या घटनेमुळे स्थानिक समुदाय आणि क्रिकेटप्रेमींमध्ये शोकाची लाट पसरली आहे.
हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मंधानाने झळकावले विक्रमी शतक! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू
व्हायरल व्हिडिओमध्ये हरजीत सिंग षटकार मारताना आणि नंतर अचानक मैदानावर बसताना दिसत आहेत. त्यानंतर छातीत दुखत असल्याने तो पडतो आणि सहकारी खेळाडू त्याच्या मदतीसाठी धावतात. हा प्रसंग प्रेक्षकांसाठी अत्यंत भावनिक आणि धक्कादायक होता. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.





