Hardik Pandya Girlfriend : हार्दिक आता ‘या’ मॉडेलच्या प्रेमात! इन्स्टा स्टोरीवर शेअर केले नव्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो

Hardik Pandya New Girlfriend Photo Viral : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याने इन्स्टा स्टोरीवर मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेल्या या फोटोमध्ये हार्दिकने माहिकाला टॅगही केले आहे. यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मात्र, हार्दिक आणि माहिकाने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
कोण आहे माहिका शर्मा?
24 वर्षीय माहिका शर्मा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. दिल्लीत तिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्थशास्त्र आणि वित्त विषयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर माहिकाने फ्रीलान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. ती रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडीओत दिसली, तसेच “इनटू द डस्क” आणि ओमंग कुमार दिग्दर्शित “पीएम नरेंद्र मोदी” (2019) या चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका साकारल्या.
Hardik pandya instagram story
Chilling with rumoured girlfriend Mahieka Sharma #HardikPandya #Girlfriends #rumoured #maisonmargiela pic.twitter.com/BbQFcgZ4ok— muffatal vohra (@gurjarparth66) October 10, 2025
माहिकाने अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांसारख्या नामांकित फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये माहिकाला ‘मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ती इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेसशी संबंधित कंटेंट नियमितपणे शेअर करते.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिलचा शतकी धमाका! रोहितचा विक्रम मोडत WTC मध्ये रचला इतिहास
हार्दिकचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत –
हार्दिक पांड्या आणि मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टँकोविक यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगा असून, त्याचा सांभाळ ते एकत्रितपणे करत आहेत. घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव मॉडेल जॅसमिन वालियासोबत जोडले गेले होते, परंतु काही काळातच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. आता माहिका शर्मासोबतच्या फोटोमुळे हार्दिक पुन्हा चर्चेत आला आहे. हार्दिक आणि माहिकाच्या नात्याबाबत चाहते आणि माध्यमांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा – IND vs WI : साई सुदर्शनच्या डेअरिंगला सलाम! चेंडू एवढ्या जोरात लागला तरी सोडला नाही कॅच, पाहा VIDEO
सोशल मीडियावर फोटो व्हायरल –
हार्दिकने शेअर केलेला समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे हार्दिक आणि माहिका डेटिंग करत असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. तरीही, दोघांनी याबाबत मौन बाळगले आहे. हार्दिकच्या चाहत्यांना त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही कमालीची उत्सुकता आहे.





