Hardik Pandya Girlfriend : हार्दिकने कमबॅकचं श्रेय गर्लफ्रेंडला देताच तिच्या कमेंटनं वेधलं लक्ष; म्हणाली, ‘माझ्या किंगसारखं कोणीही…’

Hardik Pandya reaction and Girl friend : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला, पण या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या जोरदार पुनरागमनाची. दुखापतीमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ खेळापासून दूर असलेल्या हार्दिकने या सामन्यातून दमदार कमबॅक केले. ज्याच्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
दुखापतीनंतर पहिल्या टी-२० सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आपल्या खेळीचे श्रेय गर्लफ्रेंड महिका शर्माला दिले. त्याचबरोबर महिकाने त्याच्याबद्दल केलेली कमेंटही चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये झालेल्या आशिया चषकात डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे हार्दिकला संघाबाहेर राहावे लागले होते. पुनरागमनासाठी त्याने बंगळूरमधील बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये बराच वेळ घालवला आणि कठोर मेहनत घेतली.
हार्दिकने पुनरागमनाचे श्रेय दिले गर्लफ्रेंडला –
View this post on Instagram
खेळापासून दूर असताना हार्दिकने या वेळेचा उपयोग कुटुंबासोबत आणि महिका शर्मासोबत घालवण्यासाठी केला. याच काळात त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा पहिल्यांदा सार्वजनिक झाली. ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावर त्यांना एकत्र पाहिल्यानंतर अफवा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनी समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीचे फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टी केली. आता पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर बीसीसीआयशी बोलताना हार्दिकने आपल्या पुनरागमनाचे श्रेय प्रियजनांना दिले. ज्यामध्ये त्याने गर्लफ्रेंडचा विशेष उल्लेख केला.
हेही वाचा – ICC ODI Rankings : किंग कोहलीची मोठी झेप; रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस!
दुखापती तुमच्या मानसिकतेची परीक्षा घेतात –
हार्दिक पंड्या म्हणाला, “दुखापती तुमच्या मानसिकतेची परीक्षा घेतात आणि अनेक शंका निर्माण करतात. माझ्या यशस्वी पुनरागमनाचे बरेच श्रेय माझ्या प्रियजनांना जाते. पण माझ्या जोडीदाराचा विशेष उल्लेख करेन. कारण ती माझ्या आयुष्यात आल्यापासून बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहे. तसेच मी जेव्हा जेव्हा मैदानावर येतो, तेव्हा मला असे वाटते की प्रेक्षक मला फलंदाजी करताना पाहण्यासाठी आले आहेत. यामुळे मला अधिक आत्मविश्वास मिळाला. मी स्वतःवर आणि माझ्या कौशल्यांवर विश्वास ठेवतो, ज्याचा मला फायदा झाला.”
माझ्या राजासारखं कोणीही नाही – माहिका
यानंतर बीसीसीआयने हार्दिक पंड्याची मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे. ती कमेंटमध्ये म्हणाली, ‘माझ्या राजासारखं कोणीही नाही.’ ही कमेंट सध्या मोठा प्रमाणात चर्चेत आहे.





