Hardik Pandya Instagram : हार्दिक पंड्याचं इन्स्टा अकाउंट अचानक गायब! मुंबई इंडियन्स सोडणार की ट्रोलिंगला कंटाळला?
Hardik Pandya Instagram : हार्दिकचे इन्स्टा अकाउंट अचानक दिसेनासे झाल्याने सोशल मीडियावरील क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

Hardik Pandya Instagram Account Deactivated : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या मैदानाबाहेरही मोठ्या वादात सापडला आहे. हार्दिकचे इन्स्टा अकाउंट अचानक दिसेनासे झाल्याने सोशल मीडियावरील क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक युजर्सना त्याच्या प्रोफाईलवर ‘युझर नॉट फाऊंड’ असा मेसेज दिसला, तर काहींना त्याचे प्रोफाईल फोटो आणि पोस्ट्स गायब असल्याचे दिसले. या घटनेनंतर हार्दिकने अकाउंट डिलीट किंवा डीएक्टिव्हेट केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या, मात्र काही तासांनंतर त्याचे अकाउंट पूर्ववत झाले.
मुंबईच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर हार्दिक ट्रोलर्सच्या निशाण्यावर!
हार्दिक पंड्यासोबत घडलेली ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ मध्ये अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईला १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले आणि १० संघांच्या गुणतालिकेत संघ थेट ९ व्या क्रमांकावर फेकला गेला. या खराब कामगिरीनंतर हार्दिकला सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रचंड रोषाला आणि वैयक्तिक ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अभिनेत्री महिका शर्मासोबतच्या त्याच्या साखरपुड्याच्या अफवांनीही जोरदार चर्चा रंगवली होती.
#InPics | Hardik Pandya and Mahika Sharma were seen together following Mumbai Indians’ exit from IPL 2026. Photos of the duo were shared by Mahika Sharma on her social media account.
[📷-mahiekasharma\ IG ]#HardikPandya #MahikaSharma #IPL2026 #MumbaiIndians #IndiaTodaySocial pic.twitter.com/fNStat0VNV
— IndiaToday (@IndiaToday) May 28, 2026
‘०७:०७’ च्या त्या गूढ फोटोमुळे सीएसकेमध्ये जाण्याच्या चर्चा!
Hardik Pandya has reactivated his Instagram account after deactivating it for the last 3 hours. pic.twitter.com/FU1k0g3jX8
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 27, 2026
हार्दिकने अलीकडेच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या फोनवर ‘०७:०७’ (एमएस धोनीचा जर्सी नंबर ७) ही वेळ दिसत होती. यानंतर तो मुंबई इंडियन्स सोडून सीएसकेमध्ये जाणार असल्याच्या अफवांना बळ मिळाले. त्यातच भारताचा फिरकीपटू आऱ अश्विनने ‘एक्स’वर ‘पथिराना, 07:07 आणि स्टोक्स’ अशी गूढ पोस्ट केल्यामुळे या चर्चा अधिक तीव्र झाल्या. काही रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने इन्स्टावर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत पेजला आणि अनेक खेळाडूंना अनफॉलो केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
हेही वाचा – Parthiv Patel Statement : “त्याचे व्हिडीओ पाहून आम्ही प्लॅन बनवलाय…”; वैभव सूर्यवंशीसाठी गुजरातची खास तयारी, पार्थिव पटेलचा खुलासा
हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात – जाफरचे विधान!
आयपीएल २०२६ मध्ये हार्दिकची वैयक्तिक कामगिरीही अत्यंत सुमार राहिली. त्याने ८ डावांत अवघ्या १४६ धावा केल्या आणि गोलंदाजीत फक्त ३ विकेट्स घेतल्या. यावरून भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर म्हणाला, “मी हार्दिकला संघात नक्कीच कायम ठेवेन, पण त्याला कर्णधार बनवणार नाही. त्याने दडपणाशिवाय खेळावे अशी माझी इच्छा आहे.”





