GT vs MI सामन्यात हार्दिकची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया त्याला चीअर करताना दिसली, पाहा VIDEO

GT vs MI Hardik Pandya’s girlfriend Jasmine Walia’s video viral : आयपीएल २०२५ चा ९वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९६ धावा केल्या आहे. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्याची कथित गर्लफ्रेंड त्याला चीअर करताना दिसत आहे.
गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार्दिकची गर्लफ्रेंड दिसली –
आयपीएल २०२४ च्या शेवटच्या सामन्यात, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळे हार्दिक पंड्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिसला नाही. मात्र, हार्दिक पंड्या आयपीएल २०२५ च्या नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध कर्णधार म्हणून परतला. या सामन्यात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत मैदानावर आला.
https://twitter.com/kuchnahi1269083/status/1905992794256089370
https://twitter.com/kuchnahi1269083/status/1905992739403047182
नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर पांड्याचे नाव वालियाशी जोडले गेले –
https://twitter.com/Cricopinion247/status/1906036481853997287
त्यादरम्यान, त्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया स्टँडमध्ये बसलेली कॅमेऱ्यात कैद झाली. वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही व्यक्तिमत्व आहे, जी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीच्या शेजारी बसलेली दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हार्दिक पंड्या सर्बियन डान्सर आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर वालियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. कारण हार्दिक पंड्या खेळत असताना वालिया अनेक वेळा स्टँडमध्ये हार्दिकला प्रोत्साहन देण्यासाठी आलेली दिसली आहे.
हेही वाचा – GT vs MI : शुबमन गिलने रचला इतिहास! आयपीएलमध्ये कोणत्याच भारतीय खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
साई सुदर्शनने झळकावले अर्धशतक –
Innings Break! #MI make a comeback with the ball, but #GT finish with 1⃣9⃣6⃣ on the board! 👌
Who will end up with 2⃣ points tonight? 🤔
Scorecard ▶ https://t.co/lDF4SwnuVR #TATAIPL | #GTvMI | @gujarat_titans | @mipaltan pic.twitter.com/o5xdBI0AlE
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुदर्शनच्या ४१ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६३ धावांच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत आठ गडी गमावून १९६ धावा केल्या. सुदर्शन वगळता गुजरातचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्याने दोन, तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





