Hardik Pandya : अर्धशतकानंतर फ्लाइंग किस ते विजयानंतर कार राइड….हार्दिक-माहिकाचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Hardik Mahieka video viral after IND vs SA 5th T20 : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने दुखापतीनंतर मैदानावर पुनरागमन करताच, आपला जुना दरारा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी करत भारताला ३-१ ने विजय मिळवून दिला. विशेषतः अहमदाबादमधील शेवटच्या सामन्यात हार्दिकच्या बॅटने जे वादळ आणले, त्यात दक्षिण आफ्रिका संघाची वाताहत झाली. या विजयाची साक्षीदार हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील होती. शेवटच्या सामन्यानंतर दोघांचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
माहिकाच्या उपस्थितीत केला खास विक्रम –
१९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हार्दिकने अविश्वसनीय फलंदाजी केली. त्याने मैदानात येताच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. केवळ १६ चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले, जे भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
हार्दिकचा अर्धशतकानंतर माहिकाला फ्लाईंग किस –
Hardik Pandya’s flying kiss steals the show!
Spotted with girlfriend Mahieka Sharma cheering wildly from the stands – goals! 💗#HardikPandya #INDvSA pic.twitter.com/6Rq3iBtEtJ
— Pintu Singh #MSD #THALA#SidHeart💞💞#CSK Forever (@pintusi11376418) December 19, 2025
हार्दिकने एकूण २५ चेंडूंत ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर त्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मा फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे माहिका शर्मा पहिल्यांदाच बॉयफ्रेंड हार्दिक पंड्याला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होती आणि हार्दिकने तिला निराश केले नाही. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने योगदान देताना डेवाल्ड ब्रेविसची महत्त्वाची विकेट घेतली.
हेही वाचा – Team India : संजू-हार्दिकने दिलदारपणाने जिंकली मनं! मैदानाबाहेर ‘त्या’ कृतीने चाहते भारावले, पाहा VIDEO
कार राईडने साजरा केला विजय –
After winning the T20I series, Hardik Pandya took his girlfriend Mahieka Sharma for a car ride.❤️ pic.twitter.com/hwqjkpotN9
— Mention Cricket (@MentionCricket) December 20, 2025
मालिका जिंकल्यानंतर हार्दिकने अनोख्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला. त्याने अहमदाबादच्या रस्त्यांवर आपल्या लक्झरी कारमधून माहिकाला फिरवले. माहिका शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या खास क्षणांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हार्दिक गाडी चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Gautam Gambhir : टी-२० वर्ल्ड कपसाठी मोठा बदल! कोच गंभीरचा ‘यू-टर्न’; सूर्यकुमारने केला खुलासा
आता लक्ष टी-२० वर्ल्ड कपवर –
आशिया चषकातील दुखापतीनंतर हार्दिकने या मालिकेतून दमदार पुनरागमन केले आहे. त्याने संपूर्ण मालिकेत १४२ धावा केल्या आणि ३ विकेट्सही घेतल्या. पहिल्या आणि शेवटच्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकांमुळे भारताला विजय मिळवणे सोपे झाले. आता हार्दिकचे मुख्य लक्ष जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणारी मालिका आणि त्यानंतर ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ कडे लागले आहे.





