हार्दिक जोशीने पत्नी अक्षयाला दिली ‘ही’ महागडी भेटवस्तू; फोटो केला शेअर

मुंबई – ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. सध्या अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींबाबत ते आपली माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच हार्दिकने अक्षयाला एक महागडी भेटवस्तू दिली आहे.
हार्दिकने अक्षयाला आयफोन 15 प्रो मॅक्स भेट म्हणून दिला आहे. त्याचा फोटो अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे गिफ्ट अक्षयला खुप आवडले असून तिने हार्दिकचे आभार मानले आहेत. तर अनेकांनी अक्षयाचे अभिनंदन केले आहे. अक्षयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात हार्दिकने गिफ्ट केलेला आयफोन 15 प्रो मॅक्स दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्या वर आनंद दिसून येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानच हार्दिक आणि अक्षयाचे प्रेम झाले आणि त्यांनी मागील वर्षी 2 डिसेंबर रोजी विवाह केला. काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सध्या तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनय करत आहे.





