ट्रुडो खोटे बोलले! “निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग नाही” ; कॅनेडियन समितीचा महत्वाचा अहवाल

Hardeep Singh Nijjar Murder Case । खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकाणावरून मागच्या अनेक वर्षांपासून भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या कॅनडाच्या सरकारचा आता खरा चेहरा जगासमोर आला आहे. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत” अशा प्रकारचा अहवाल कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीने सादर केला आहे. समितीच्या या अहवालाने कॅनडाचे सरकार म्हणजेच पंतप्रधान आजपर्यंत जस्टिन ट्रुडो हे खोटं बोलत होते हे सिद्ध झाले आहे.
हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय राजदूतांसह अनेक लोकांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वारंवारपणे केला होता. मात्र आता, या कॅनेडियन समितीचा अहवाल वेगळाच आल्याने तिथल्या सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. अहवालानुसार, “कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये कोणत्याही परदेशी राज्याशी निश्चित संबंध सिद्ध होऊ शकला नाही.” असे सांगण्यात आले आहे.
ट्रुडो यांनी भारताविरुद्ध खूप विष ओकले Hardeep Singh Nijjar Murder Case ।
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो बऱ्याच काळापासून भारताविरुद्ध इतके विष ओकत आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. हरदीप निज्जर हत्याकांडात भारताला दोष देण्याची एकही संधी ट्रुडो यांनी सोडलेली नाही. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्याकडे याचे पुरावेही आहेत.
कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला Hardeep Singh Nijjar Murder Case ।
जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. जरी ट्रुडो भारताविरुद्ध पुरावे सादर करत राहिले, तरी कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील चारही आरोपींना जामीन मंजूर केला. आता या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
भारतीय आरोपी कोण होते?
निज्जरच्या हत्येबाबत कॅनडा भारतावर सतत गंभीर आरोप करत होता. तथापि, कॅनडाने नंतर हे आरोप मागे घेतले. या खून प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची नावे आहेत- करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग.
हेही वाचा
खलिस्तानी समर्थक पन्नूनकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना धमकी ; सरकारने दिली महत्वाची माहिती





