हरभजन सिंग धावला पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीला; बोटी आणि रुग्णवाहिकाही पुरवल्या….

Harbhajan Singh | पंजाबला सध्या भीषण पुराचा तडाखा बसला आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. १.७५ लाख हेक्टर शेती क्षेत्रातील उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत भारताचे माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग पंजाबमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे.
हरभजनने मदतकार्यासाठी बोटी आणि रुग्णवाहिका पुरवल्या आहेत आणि निधी उभारून त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. हरभजनने त्याच्या खासदार निधीतून आठ स्टीमर बोटी मंजूर केल्या आहेत. तसेच स्वतःच्या पैशातून आणखी तीन बोटी दिल्या आहेत. या प्रत्येक बोटीची किंमत सुमारे 4.5 ते 5.5 लाख रुपये आहे. Harbhajan Singh |
This is the time to stand with Punjab. Our brothers and sisters are in need, and it is our shared responsibility to support them. Together, we can rebuild, restore, and bring hope back to Punjab. I humbly request you all to come forward and lend your support in any way you can… pic.twitter.com/GqwZjyxaFe
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2025
५० लाख रुपये जमा
हरभजन सिंगने त्याच्या मित्रमंडळी आणि ओळखीच्या लोकांकडूनही मदत मागितली. त्याच्या आवाहनावर एका क्रीडा संघटनेने ३० लाख रुपये दिले आहेत, तर त्यांच्या दोन जवळच्या मित्रांनी अनुक्रमे १२ लाख आणि ६ लाख रुपये दिले आहेत. बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी हरभजन सिंगने ५० लाख रुपये जमा केले आहेत. या रकमेतून लोकांना अन्नधान्य आणि औषधे पोहोचवली जात आहेत. Harbhajan Singh |
दरम्यान, पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचले आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांची पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि सामाजिक संघटना सतत मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. हरभजन सिंग स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. Harbhajan Singh |
हेही वाचा:
सोशल मीडियावरील बंदीविरोधात नेपाळमध्ये तरुणाई आक्रमक : निदर्शक संसदेत घुसले, एकाचा मृत्यू




