Harbhajan Singh Controversy : हरभजन सिंग अडकला नव्या वादात, कॉमेंट्री करताना जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप

Harbhajan Singh in Big Controversy after Racist Remark On Jofra Archer in SRH vs RR : आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होताच आता वादांनाही सुरुवात झाली आहे . सध्या आयपीएल कमेंट्री पॅनलचा भाग असलेला माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग वादात सापडला आहे. रविवारी एसआरएच आणि आरआर यांच्यातील सामन्यादरम्यान त्यानी केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. भज्जीवर वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यांचे विधान जोफ्रा आर्चरबद्दल होते आणि चाहते सोशल मीडियावर हरभजनच्या या विधानावर टीका करत आहेत.
हरभजन असं काय म्हणाला ज्यामुळे वाद निर्माण झाला?
हरभजनची टिप्पणी हैदराबादच्या डावाच्या १८ व्या षटकाशी संबंधित आहे. त्यावेळी जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता आणि इशान किशन आणि हेनरिक क्लासेन फलंदाजी करत होते. १८ व्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर क्लासेनने सलग बाऊंड्री मारल्या. यावेळी हरभजनने वादग्रस्त वक्तव्य केले. तो म्हणाला, ‘लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने धावतात आणि इथे आर्चर साहेबांचे मीटरही वेगाने धावतोय.’ सोशल मीडियावर चाहते याबद्दल खूप संतापले आहेत.
हरभजनने माफी मागावी – चाहत्यांची मागणी
𝗛𝗮𝗿𝗯𝗵𝗮𝗷𝗮𝗻 𝗠𝗨𝗦𝗧 𝗔𝗽𝗼𝗹𝗼𝗴𝗶𝘇𝗲:
He called Jofra Archer a "black London taxi" during live commentary During IPL.
Shame Shame Shame#HarbhajanSingh #JofraArcher #IPL2025 #RRvsSRH #CSKvsMI pic.twitter.com/zNPlVeBfgN— Pakistan Cricket Team USA FC (@DoctorofCricket) March 23, 2025
Harbhajan Singh (@harbhajan_singh) has called @JofraArcher a "black London taxi" during live commentary.
Isa Guha was made to apologise on air for her comments about Bumrah. Will the BCCI or Star now ask Harbhajan to apologise live on air? Will the ECB say anything? 💰 #IPL pic.twitter.com/ANGxvsCMlb
— M (@anngrypakiistan) March 23, 2025
https://twitter.com/FourOverthrows/status/1903776150595469777
या प्रकरणावरुन चाहत्यांनी हरभजनवर टीका केली आहे आणि त्याला माफी मागण्यास सांगितले आहे. परंतु, हरभजन सिंगने अद्याप या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा माफी मागितलेली नाही. हरभजनचे हे विधान आर्चर खूप महागडा ठरला म्हणून होते. त्याने चार षटकांत ७६ धावा दिल्या आणि एकही विकेट्स घेतली नाही. आर्चरच्या मीटर रनिंगचा अर्थ हरभजनला असाच म्हणायचा होता.
हेही वाचा – Indian Womens Cricket : BCCI ने जाहीर केला केंद्रीय करार, अव्वल श्रेणीत फक्त ‘या’ ३ खेळाडूंना मिळाले स्थान
हैदराबादने राजस्थानवर केली मात –
सामन्याबद्दल बोलायचे तर, हैदराबादने राजस्थानचा ४४ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ हंगामाची सुरुवात विजयाने केली. इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ६ बाद २८६ धावा केल्या, जी या स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरादाखल, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली भागीदारी केली पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थान संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद केवळ २४२ धावा करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.





