Harbhajan Singh : पंजाब सरकारविरोधात हरभजन सिंग यांची न्यायालयात धाव; केली ‘ही’ मागणी
राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी पंजाबमधील आप सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. काढून घेतलेली सुरक्षाव्यवस्था पुन्हा बहाल करण्याचा आदेश पंजाब सरकारला दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Harbhajan Singh : राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी पंजाबमधील आप सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. काढून घेतलेली सुरक्षाव्यवस्था पुन्हा बहाल करण्याचा आदेश पंजाब सरकारला दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यसभेच्या ७ खासदारांनी नुकताच आपला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या खासदारांमध्ये हरभजन यांचाही समावेश आहे. पंजाब पोलिसांनी पक्षांतर केल्यानंतर हरभजन यांना पुरवलेली सुरक्षा मागे घेतली.
अर्थात, त्या घडामोडीनंतर केंद्र सरकारने हरभजन यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) सोपवली. तसे असले तरी हरभजन यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अतिशय मनमानी पद्धतीने माझे सुरक्षाकवच काढून घेण्यात आले. ती कृती करताना सुरक्षाविषयक धोक्याचा फेरआढावा घेण्यात आला नाही.
माझी बाजूही ऐकून घेतली गेली नाही, असे त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. पक्षांतरानंतर हरभजन आणि पंजाबमधील काही खासदारांच्या निवासस्थानांबाहेर आपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्या घटनेचा संदर्भ सुरक्षाविषयक धोक्याचा उल्लेख करताना याचिकेत देण्यात आला आहे.






