हर हर महादेव ! अमरनाथ यात्रेला सुरूवात; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा ३ जुलै अर्थात आजपासून सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांद्वारे यात्रा होते. जम्मू-काश्मीरमधील ३८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत भगवान शंकराचे (बाबा बर्फानी) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पहाटे जम्मूहून यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. वार्षिक अमरनाथ यात्रेत सामील होण्यासाठी पहिल्या तुकडीत १,११५ महिला, ३१ मुले आणि १६ ट्रान्सजेंडरसह ५,८९२ यात्रेकरूंची तुकडी पहाटे ४.३० वाजता बेस कॅम्पमधून निघाली.
बाबा अमरनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी कश्मीरच्या बालताल बेस कॅम्पमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. बालतालमध्ये आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी टेन्ट मध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या बेसवर ३००० पेक्षा अधिक टेन्ट उभारले गेले आहेत. या टेन्टमध्ये राहून पहाटे अमरनाथ यात्रेला सुरुवात होते. यात्रेच्या पहिल्याच दिवशी याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत.
अतिरिक्त सुरक्षा
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा करण्यात आली आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) 580 कंपन्या तैनात केल्या आहेत. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
हेही वाचा:





