#IPL2022 | आयपीएलशी जोडले गेल्याचा आनंद – गौतम गंभीर
Updated On:

नवी दिल्ली – खेळाडू म्हणून कारकीर्द संपली असली तरीही पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेशी जोडले गेल्याचा आनंद आहे, असे मत भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू व कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
पुढील वर्षीपासून या स्पर्धेत लखनौ व अहमदाबाद हे दोन नवे संघ दाखल होत असून त्यातील लखनौ संघाने गंभीरला मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएलमध्ये गंभीर पहिल्यांदाच एखाद्या संघात मार्गदर्शक म्हणून कार्यरत होणार आहे.
लखनौ संघाने झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली असून गंभीर त्यांच्यासह संघासाठी कार्यरत राहणार आहे.
गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला दोनवेळा विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे लखनौ संघालाही असेच यश मिळवून देण्यासाठी गंभीर सज्ज बनला आहे.





