happy birthday : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित

मुंबई – बॉलीवूडमधील ‘धकधक गर्ल’ अर्थात मराठमोळी ‘माधुरी दीक्षित’ आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आज (दि. 15) माधुरीचा वाढदिवस आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.
अगदी लहान वयात ‘अबोध’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीला लोकप्रियता मिळाली ती ‘तेजाब’ या चित्रपटाने. यातील ‘एक दो तीन’ हे गाणे खुपच गाजले होते. त्यानंतर यशाने तिची पाठ सोडली नाही. माधुरीचा जन्म मुंबईत 1984 ला झाला.
अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी लोकप्रिय ठरली आणि दोघांनी अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले.
1999 मध्ये माधुरी डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. त्यानंतर काही वर्ष तिने सिनेमातून ब्रेक होता. मात्र, ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून माधुरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.









