HanuMan Collection : बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’ची झेप ! कमाईच्या बाबतीत बड्या-बड्या सिनेमांना टाकलं माग, आकडेवारी एकदा पाहाच

Hanuman : ‘हनु मान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मोठ्या पडद्यावर या चित्रपटाची महेश बाबूच्या ‘गुंटूर करम’, विजय सेतुपती आणि कतरिना कैफच्या ‘मेरी ख्रिसमस’ आणि धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’सह अनेक चित्रपटांशी जबरदस्त टक्कर झाली. आता या सर्व चित्रपटांवर हनु मानची गदा भारी पडली असून हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे.
कमी बजेटच्या ‘हनु मान’ने दक्षिण भारतातील अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मात दिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसाय करत आहे. या चित्रपटाला त्याच्या व्हीएफएक्स आणि सीजीआयसाठी खूप प्रशंसा मिळत आहे आणि यासह चित्रपटगृहांमध्ये ‘हनु मान’ पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4.5 कोटींचे खाते उघडले आणि त्यानंतर या चित्रपटाने एवढा वेग घेतला की सर्व चित्रपटांना मागे टाकले, आता हनु मानच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. ‘हनु मान’चे 8 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 98.80 कोटी रुपये झाले आहे. ‘हनु मान’ बॉक्स ऑफिसवर एक छोटासा पॅकेट आणि मोठा धमाका ठरत आहे.
#Hanuman WW Box Office
Hanuman ENTERS ₹150 cr club in style with just 7 days of run.
The film is racing towards ₹200 cr club.
Day 1 – ₹ 21.35 cr
Day 2 – ₹… pic.twitter.com/wt4tz37LBl— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 19, 2024
हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत असून चांगला व्यवसाय करत आहे. जगभरात या चित्रपटाने 21.35 कोटींचे कलेक्शन केले. त्यानुसार ‘हनु मान’ने सात दिवसांत जगभरात 150.58 कोटी रुपये कमवले आहेत. हा चित्रपट 8 व्या दिवशी जगभरात 160 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.
‘हनु मान’ने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती पण त्यानंतर त्याने इतकी झेप घेतली की त्याने महेश बाबूचा गुंटूर करम, धनुषचा कॅप्टन मिलर आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या मेरी ख्रिसमसला मागे टाकले. आता हा चित्रपट 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे.





