“दोषी गुन्हेगाराला समाजासमोर फाशी द्या, त्याशिवाय…”; बदलापूरमधील घटनेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

Supriya Sule on Badlapur School | बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात एका सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पालकांसह नागरिकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दोषी गुन्हेगाराला समाजासमोर फाशी द्यायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दोन चिमुरड्यांवर झालेली अत्याचाराची घटना चीड आणणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. ही एकदम घाणेरडी विकृती आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी समाजासमोर फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असं वागण्याची भिती वाटली पाहिजे,” असे यावेळी त्यांनी म्हटलं आहे. Supriya Sule on Badlapur School |
पुढे त्या म्हणाल्या, “राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी योजना आणत आहे, मग त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. गृहमंत्र्यांनी अधिक लक्ष घालून काम करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी. २०० कोटींच्या जाहीराती करून लाडकी बहीण करत काही जण फिरत आहेत, पण या बहिणींची, लेकींची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची आहे.” Supriya Sule on Badlapur School |
“हा संवेदनशील विषय असून तो संवेदनशील पध्दतीने जपला गेला पाहिजे. त्यांच्या बद्दलची माहिती त्यांची ओळख, त्यांचं नाव हे पुर्णपणे लपवले गेले पाहिजे. त्या मुलींसमोर पुर्ण आयुष्य आहे, त्या कुटुंबाची प्रायव्हसी जपली गेली पाहिजे. त्या मुलींचं आणि कुटुंबाचं समुपदेशन केलं गेलं पाहिजे,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. या शाळेतील सीसीटीव्ही देखील बंद होते. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास लावले, असा आरोप पालकांनी केला आहे.
हेही वाचा :





