हात बांधलेले, तोंडावर बुरखा; संजय राऊतांंनी अक्षय शिंदेचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केला सवाल

Akshay Shinde Encounter | बदलापुरातील नामांकित शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सोमवारी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर काही प्रश्न उपस्थित केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अक्षय शिंदेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिसांनी त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर काळे फडके बांधलेले दिसत आहे. “याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते, तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे-फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, ” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
याने पोलिसांवर हल्ला केला?
अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता.
त्यामुळे नक्की काय घडले?
कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत?
महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।
@Dev_Fadnavis pic.twitter.com/wo2dvqoBBs— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2024
शरद पवार ट्वीट
या घटनेवर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया एक्सवर शरद पवार म्हणाले, “बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.”
नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे हा तळोजा तुरुंगात होता. सोमवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता तळोजा तुरूंगातून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस घेऊन जात होते. बदलापूर पोलिसांचे पथक तळोजा तुरुंगात गेल्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर ते तळोजा तुरुंगातून बाहेर पडले.
त्यानंतर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर व्हॅन आल्यानंतर अक्षयने पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या.
यापैकी एक गोळी मोरेंच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यावेळी पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली आणि यात त्याचा मृत्यू झाला.





