Ben Stokes : दुखापतग्रस्त बेन स्टोक्स संपूर्ण हंगामातून बाहेर, इंग्लंडने ‘या’ खेळाडूकडे सोपवली कर्णधारपदाची धूरा…

Injured Ben Stokes Ruled Out Summer Season : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळताना दुखापतग्र्सत झाला होता. दुखापतग्रस्त स्टोक्स श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तसेच संपूर्ण इंग्लिश समरमधून बाहेर पडला आहे. गेल्या रविवारी ‘द हंड्रेड’मध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून फलंदाजी करताना स्टोक्सला दुखापत झाली होती. स्टोक्सला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. आता स्टोक्सच्या जागी एका खेळाडूकडे इंग्लंडची कमान सोपवण्यात आली आहे.
स्टोक्स संपूर्ण इंग्लिश उन्हाळी हंगामातून बाहेर झाला असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. मंगळवारी झालेल्या स्कॅननंतर स्टोक्स श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. 21 ऑगस्टपासून श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
Wishing you all the best in your recovery, Ben 👊
— England Cricket (@englandcricket) August 13, 2024
ओली पोप संभाळणार कर्णधारपदाची धूरा…
स्टोक्सच्या अनुपस्थितीत ऑली पोप इंग्लंड कसोटी संघाची धुरा सांभाळेल, असे इंग्लंड बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार म्हणून ओली पोप दिसणार आहे. ऑली पोप हा इंग्लंड कसोटी संघाचा 82 वा कर्णधार असेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याआधी केवळ एका प्रथम श्रेणी सामन्याचे नेतृत्व ओली पोपने केले आहे. पोप याने सप्टेंबर 2021 मध्ये सरे संघाची कर्णधारपद भूषविले होते. हा सामना सरे आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात खेळला गेला होता.
Cricket : अफगाणिस्ताननंतर आता BCCIने नेपाळला दिला मदतीचा हात, ‘या’बाबतीत करणार मोठं सहकार्य….
पाकिस्तान मालिकेतून स्टोक्सचे होऊ शकते पुनरागमन…
इंग्लंड बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, स्टोक्सच्या पुनरागमनाचे लक्ष्य इंग्लंडचा पाकिस्तान दौरा असेल. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 7 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील शेवटची कसोटी 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी मुलतानमध्ये, दुसरी कराचीत आणि तिसरी कसोटी रावळपिंडीत खेळवली जाईल. आता स्टोक्स पाकिस्तान दौऱ्यातून पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





