हॅम्बुर्ग – जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील एका चर्चमध्ये बंदुकधारींनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात सुमारे 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे.
पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे की, या गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, काहींचा मृत्यू झाला आहे. गुन्ह्याच्या हेतूबद्दल कोणतीही विश्वसनीय माहिती नाही. मात्र नागरिकांनी अफवा पसरवू नयेत किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.
पोलिसांनी डिझास्टर अलर्ट ऍप वापरून परिसरात “अत्यंत धोक्याचे” संकेत दिले आहेत. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला झालेल्या चर्चच्या इमारतीजवळील रस्ता बंद केला आहे. यासोबतच गुन्हेगार पळून गेल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हेगार इमारतीत पडून असावा किंवा त्याचा मृत्यू झाला असावा.
#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा
युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जर्मनी हा देश जिहादी गटांसाठी लक्ष्य बनला आहे, विशेषत: इराक आणि सीरियामधील इस्लामिक स्टेट युतीमधील सहभागामुळे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2013 ते 2021 दरम्यान, देशात धोकादायक समजल्या जाणाऱ्या इस्लामवाद्यांची संख्या पाच वरून 615 वर पोहोचली आहे.