Match Fixing : क्रिकेट विश्वात खळबळ; श्रीलंकेचा विश्वविजेता खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी!

Sachitra Senanayake found guilty of match-fixing : क्रिकेट विश्वात मॅच फिक्सिंगचे सावट कायम आहे. श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला आता दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती, पण २०२३ मध्ये जामिनावर सुटका झाली. आता तपास पूर्ण झाल्यावर सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे.
हंबनटोटा हायकोर्टाने सेनानायकेला दोषी ठरवले –
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता हंबनटोटा हायकोर्टाने त्याला मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवले आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने एका सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
The Attorney General has filed an indictment before the Hambantota High Court against former cricketer Sachithra Senanayake, over alleged match-fixing during the 2020 Lanka Premier League:.- Hiru #CricketTwitter pic.twitter.com/XY3KgqaPfY
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) June 5, 2025
अटॉर्नी जनरलच्या विभागाने सांगितले की, श्रीलंकेत अलीकडेच लागू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगसाठीचा हा पहिलाच खटला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सेनानायकेने कोलंबो किंग्सकडून खेळणाऱ्या थारिंदु रत्नायकेला फिक्सिंगची ऑफर दिली होती.
हेही वाचा – IND vs ENG : कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
सेनानायके २०१४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य –
२०१४ साली श्रीलंकेने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्या विजयी संघात सचित्रा सेनानायके यांचा समावेश होता. ४० वर्षीय सेनानायके यांनी २०१३ ते २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी श्रीलंकेकडून ४९ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ५३ विकेट्स घेतल्या, तर टी-२० मध्ये त्यांनी २५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तो आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. २०२३ च्या हंगामात तो केकेआर संघाचा सदस्य होता.





