रात्रीत करोनाबाधितांचे अर्धशतक

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयातील संशयित म्हणून दाखल असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तसेच वाई तालुक्यातील आसले येथील मुंबईवरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय करोनाबाधित रुग्णाचे निधन झाले. जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय महिला व मुंबई येथून प्रवास करुन आलेला माण तालुक्यातील भालवडी येथील 62 वर्षीय पुरुष या दोघांचे मृत्य पश्चात रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
आतापर्यंत जिल्ह्यात 394 करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 256 रुग्णांवर उपचार सुरु असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करुन अंभेरी ता. खटाव येथील 53 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या पुरुषाला तीव्र श्वसनदाहाचा आजार होता. तसेच मुंबई येथून प्रवास करुन आलेला भाटकी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या 54 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बुधवारी आढळलेल्या या बाधित रुग्णांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यू), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला असे पाच, खटाव तालुक्यातील वांझोळी येथील 52 वर्षीय पुरुष व वरची रात्रीत करोनाबाधितांचे अर्धशतक
अंभेरी येथील 14 वर्षीय युवक असे दोन, सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21 वर्षीय युवक, कुस बुद्रुक येथील 45 वर्षीय महिला असे तीन. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष, आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालतपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, दह्याट येथील 52 वर्षीय पुरुष असे पाच, पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष. जांभेकरवाडीची 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष असे दहा. खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष असे 9. जावळी तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष असे चार, महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील 26 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला असे सहा, कराड तालुक्यातील खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती असे तीन आणि फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिला अशा 52 रुग्णांचा समावेश आहे. पुण्यातील एनसीसीएस यांनी 97 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालतील 77, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 27, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 52, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 68, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 7 अशा एकूण 231 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनसीसीएस कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.





