ज्ञानोबा..तुकाराम..ज्ञानोबा..तुकाराम जयघोषाने बेलवाडी दुमदुमली…! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण उत्साहात संपन्न

इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी, क्षेत्र देहू येथून हरिनाम गात मजल दर मजल करत क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाताना पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे भक्ती रसात नाहून जय घोष करीत वाटचाल करतात. हीच प्रथा यंदाही पालखी सोहळ्याने जपत मानाचे दोन अश्व गोल रिंगणात सोडून या अश्वांच्या तीन परिक्रमेने वारकऱ्यांनी अनेक सांप्रदायिक खेळ खेळत पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले.
धन्य मी मानिण आपुले संचित |
राहिलीसे प्रीत तुझे नामी |
धन्य जालो आता यासी संदेह नाही
न पडे या वाही काळा हाती |
ब्रम्हरस करू भोजन पंगती |
संताचे संगती सर्वकाळ |
विठ्ठल नामाचा महिमा गात निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळयांतील पहिले गोंल रींगण टाळकरी, विणेकरी, पताकावाले, पखवांजे व तुळशिवाल्या महिला व मानाचे अश्व यांनी सुरू असलेल्या हरीनामाचा गजरात परीक्रमा पुर्ण करीत. गोल रींगण सोहळ्यात लाखो नयनांचे पारणे फेडले. ज्ञानोबा….तुकाराम..ज्ञानोबा..तुकाराम या हरी गजराने बेलवाडी दुमदुमली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळयांचे सालाबाद प्रमाणे,यंदाही सणसर गावच्या हददीतील मुक्काम आटपून सकाळ च्या प्रहरात बेलवाडी कडे पालखी सोहळा मार्गस्थ झाला. या पालखी सोहळयांत बेलवाडी गावात पहिले गोंल रींगण असल्याने इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यातील मोठ्या संख्येने रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक उपस्थित होते.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अश्वांचे पूजन
तुकोबारायांचा पालखी रथ रिंगण स्थळी सकाळी ७.४० मिनिटांनी दाखल झाला. गावकऱ्यांनी पालखी रथातून खांद्यावर घेत रिंगण स्थळावरील शामियानात जयघोष करीत आणली. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तसेच पालखी विश्वस्तांच्या हस्ते रिंगण सोहळ्यात मानांच्या आश्वांचे पूजन पार पडले. सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व गावकरी उपस्थित होते. वार्यांच्या वेगाने विणेकरी झेंडेकरी, टाळकरी धावले व मानाचे अश्व पुजन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करून रिंगणात सोडण्यात आले.
माऊली…माऊली असा आवाज आसमंतात पोहचत होता. काहि निमिश्यांचा विलंब न लावता रिंगणातील अश्वांनी परीक्रमा पुर्ण केल्या. फुगडयां पावल्या रंगल्या होत्या. अश्वांच्या दौडीनंतर रींगण सोहळ्यांची सांगता करण्यांत आली.
पांडुरंगा काहि आईकावी मात!
न करावे मुक्त आता मज !
जन्मांतरे मज तैशी देई देवा !
जेणे चरण सेवा घडे तुझी !
तोफांची सलामी
बेलवाडीकर नेहमी वारकर्यांची सेवा करण्यासाठी आतुर झालेले असतात. त्याच पध्दतीने आजही आपल्या घरी वारकर्यांना भोजन व इतर सेवा देऊन वारकर्यांचा पाहुचांर न्हाहरी दिली. अशीच सेवा जन्मोजन्मी मिळू दे, असे साकडे गावकरी घालताना दिसत होते. दुपारच्या विश्वातीसाठी पालखी गावकर्यांनी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत गावातील मारूत्ती मंदिरात आणली. तोफांची सलामी देत गावकर्यांनी स्वागत केले. दुपारची न्याहरी घेऊन पालखी सोहळा लासुर्ण जंक्शन अंथूर्ण मार्गी निमगाव केतकी कडे मार्गस्थ होणार आहे.





