Pune District: क्रीडांगणांची कामे गतीने पूर्ण करणार -क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव येथे क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात मंगळवारी (दि. 8) मुंबई येथील मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
अद्ययावत टर्फचे फुटबॉल व क्रिकेट मैदान व इतर त्या परिसरातील प्रचलित असलेल्या खेळांच्या क्रीडांगणांसाठीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती, राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली.
क्रीडामंत्री भरणे म्हणाले, माणगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी बहुउद्देशीय हॉलमध्ये बॅडमिंटन कोर्टसह चेंजिंग रूम व प्रसाधनगृह, बंदिस्त प्रेक्षागृह, बॅडमिंटन कोर्ट, धावनमार्ग, विविध खेळाचे मैदान अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
महाड क्रीडा संकुलाची डागडुजी करण्यात येईल अशीही माहिती भरणे यांनी दिली. यावेळी बैठकीला मंत्री भरत गोगावले, विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रकाश वाघ उपस्थित होते.





