CJP On Gyanesh Kumar : 48 तासांची मुदत संपणार, 2 ऑक्टोबरला काय होणार? ज्ञानेश कुमारांच्या राजीन्यासाठी दीपकेंचा मोठा इशारा
CJP On Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीवरून CJPने 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा अभिजीत दीपके यांचा इशारा.

CJP On Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून निवडणूक आयोगाभोवतीचा वाद आणखी तीव्र झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संयोजक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी सांगितले की, ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल. त्यानंतर हे आंदोलन देशातील इतर शहरांमध्ये नेण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी हे आंदोलन सुरू करण्याचे सांगत दीपके यांनी लोकांना लोकशाही वाचवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. CJP ने यापूर्वीच ज्ञानेश कुमार यांना 48 तासांत राजीनामा देण्याचे अल्टिमेटम दिले होते.
If Gyanesh Kumar does not resign by tomorrow, CJP will begin its nationwide protest from Mumbai on 2 October, and take it to cities across India.
This Gandhi Jayanti let’s pledge to save democracy.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 25, 2026
SIR आणि मतदार यादीवरून वाद –
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेला (SIR) आणि मतदार यादीतील बदलांना घेऊन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा आक्षेप नोंदवले. मतदारांची नावे जोडणे, वगळणे, फॉर्म-6 आणि मतदारांच्या माहितीच्या व्यवस्थापनासह काही मुद्द्यांवर हे आक्षेप होते.
या वृत्तानंतर निवडणूक आयोगाने मात्र अंतर्गत मतभेद असल्याचे संकेत फेटाळले आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार, काही मुद्द्यांवर वेगवेगळी मते किंवा लेखी सूचना देणे ही बहुसदस्यीय संस्थेतील सामान्य प्रक्रिया आहे. SIRसह आयोगाचे अंतिम निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या संमतीनेच झाले, असा आयोगाचा दावा आहे.
VIDEO | Delhi: Addressing a press conference, Cockroach Janata Party founder Abhijeet Dipke, says, “The BJP could not achieve a majority in the 2024 elections. The panic button was pressed when they failed to achieve a majority. They had come down to 240 seats after raising the slogan of ‘400 paar’. After that, they realised that the mood of the country was changing, and the regional forces had emerged very strongly. Whether it was Uddhav Thackeray in Maharashtra, the NCP, M K Stalin, Pinarayi Vijayan, Arvind Kejriwal or Mamata Banerjee, all these Chief Ministers have been defeated one by one. This cannot be a coincidence. You can see a pattern. All these Chief Ministers had come together and campaigned unitedly in 2024. How have they been eliminated one by one? In West Bengal, 50,000 votes are deleted from Mamata Banerjee’s seat, and she loses by around 15,000 votes. One lakh votes are deleted from M K Stalin’s seat, and he loses by around 45,000 votes. In Delhi, 40,000 votes are deleted from Arvind Kejriwal’s seat, and he loses by around 4,000–5,000 votes.”
#CJP #AbhijeetDipke
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd
— Press Trust of India (@PTI_News) September 24, 2026
CJPच्या नेमक्या मागण्या काय?
CJPकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच SIR प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी आणि मतदार यादीतील बदलांशी संबंधित नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
याशिवाय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित 2023च्या कायद्यात बदल करण्याची मागणीही CJPने केली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता असावी, अशी संघटनेची भूमिका आहे.
आता 48 तासांची मुदत संपल्यानंतर CJP पुढे काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबरला मुंबईतून आंदोलन सुरू करण्याची घोषणा दीपके यांनी केली आहे.





