Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात अडीच कोटी मतदार वगळले; निवडणूक आयोगाने दिली माहिती
अनेक लोकांची नावे पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या यादीत आहेत, परंतु विधानसभा आणि लोकसभा मतदार यादीत नाहीत.

Uttar Pradesh – उत्तर प्रदेशात अडीच कोटी लोक अजूनही मतदार यादीत नाहीत, असा मोठा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांच्या म्हणण्यानुसार, अंदाजित लोकसंख्या आणि सध्याच्या मतदार संख्येच्या तुलनेत मतदार यादीतून अंदाजे २.३८ कोटी लोकांची नावे गायब आहेत. शक्य तितक्या पात्र नागरिकांचा समावेश करण्यासाठी आयोग राज्यव्यापी मोहीम राबवत आहे.
रिनवा यांनी स्पष्ट केले की, अनेक लोकांची नावे पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या यादीत आहेत, परंतु विधानसभा आणि लोकसभा मतदार यादीत नाहीत.
मतदारांच्या सोयीसाठी, प्रथमच ऑनलाइन अर्ज आणि पीडीएफ शोध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नावे जोडण्याची किंवा दुरुस्त करण्याची अंतिम मुदत १६ डिसेंबर आहे.






