कॉमेडियन सुनील ग्रोव्हर एंटरटेनर म्हणून चांगलाच ओळखला जातो, आणि त्याला लोकांना कसे हसवायचे हे माहित आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल सध्या सोशल मीडियावर पूर्णपणे व्यापलेला आहे. आणि अशा परिस्थितीत सुनील त्याच्या लोकप्रिय पात्र गुत्थीच्या लुकमध्ये फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
सुनील ग्रोव्हरने कॅप्शनमध्ये ‘फ्रेंच रिव्हिएरा’ असेही लिहिले आहे. हिना खानसह अनेक कलाकारांनी सुनील ग्रोव्हरच्या फोटोवर कमेंट करत कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या फोटोत गुत्थीने गाऊन घातलेला आहे. त्याने घातलेला गाऊन जांभळ्या रंगाचा दिसत आहे. ‘गुत्थी’ चे टिपिकल एक्सप्रेशन पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. सुनीलची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सही कमेंट करत आहेत.
अभिनेता रोनित बोसनेही त्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘डूड तुम तो छा गये.’ याशिवाय मौनी रॉय, रसिका दुग्गल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सुनील ग्रोव्हरच्या फोटोवर कमेंट केली आहे.
‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ने गुत्थी लोकप्रिय झाला…
सुनील ग्रोवरबद्दल सांगायचे तर, ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’मधील ‘गुत्थी’ या व्यक्तिरेखेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामध्ये डॉ. मशूर गुलाटी आणि रिंकू भाभी यांची भूमिकाही खूप लोकप्रिय झाली. पण, कपिल शर्मासोबतच्या भांडणामुळे त्याने कपिलचा शो सोडला.