‘या’ राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर पूर्णपणे बंदी ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Ban on gutkha and paan masala । झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने याप्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानंतर, झारखंडच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही नावाने तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण क्रियाकलापांवर एक वर्षासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
सरकारकडून आदेश जारी Ban on gutkha and paan masala ।
अतिरिक्त मुख्य सचिव सह राज्य अन्न सुरक्षा आयुक्त अजय कुमार सिंह यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार, झारखंडमध्ये गुटखा विकणे आणि त्याचे सेवन करणे आता गुन्हा असेल. आरोग्य विभागाने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३०(२)(अ) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध) नियमावली, २०११ च्या नियम २, ३ आणि ४ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
झारखंड गुटखामुक्त करण्यासाठी पुढाकार Ban on gutkha and paan masala ।
सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी, हे निर्बंध हा आदेश जारी झाल्यापासून लागू राहतील. सर्वसामान्यांच्या माहितीसाठी आणि त्यांना या आदेशाची जाणीव करून देण्यासाठी ही सूचना माध्यमांद्वारे प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झारखंड सरकारच्या वतीने, अधिसूचनेची मूळ प्रत सरकारी प्रिंटिंग प्रेस, डोरांडा येथील नोडल ऑफिसरला प्रकाशनासाठी (ई-राजपत्र) पाठवण्यात आली आहे.
जेणेकरून ते इतर विभागांमध्येही एक आदेश म्हणून अंमलात आणता येईल. झारखंड गुटखामुक्त करण्यासाठी मंत्री इरफान अन्सारी यांनी पुढाकार घेतला आहे. आता झारखंडमध्ये गुटखा विकणे आणि खाणे दोन्हीही गुन्हा ठरणार आहे. यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. इरफान अन्सारी म्हणाले की, आम्ही आमच्या मुलांना कर्करोगाने मरू देणार नाही. आता गुटखा विकणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई केली जणार आहे.





