Gurucharan Singh । अखेर बेपत्ता सोढीचा ठावठिकाणा लागला; मिसेस सोढीने सांगितलं, कुठं होता अभिनेता…

Gurucharan Singh । Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोचे अभिनेते गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्याचा पत्ता नाही. त्याचे कुटुंब आणि चाहते सर्वच जण चिंतेत आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, आपल्या मजेशीर शैलीने सगळ्यांना हसवणारा आणि नेहमी आनंदी राहण्याचा सकारात्मक संदेश देणारा ‘रोशन सिंग सोधी’ कुठे गेला?
गुरुचरण सिंह 22 एप्रिलला मुंबईला रवाना होणार होते. रात्री 8.30 वाजता ते दिल्ली विमानतळावर पोहोचले, पण त्यांनी प्रवास केला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता आपली बॅग घेऊन रस्त्यावरून चालताना दिसला. गुरुचरण सिंह बेपत्ता असल्यामुळे कुटूंबियांच्या मनात कुठे जात होता, त्याचे फ्लाइट का चुकले, त्याचे कोणीतरी खरोखरच अपहरण केले आहे का, असे प्रश्न आले.
गुरूचरण सिंगने शेवटचं दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढल्याचे पोलिस तपासात उघड झालं होत. तेव्हा पासून अभिनेत्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आता गुरुचरण सिंह आपल्या घरी परतला आहे. गुरुचरण सिंग हा धार्मिक यात्रेवर गेला होता. गुरुचरण सिंग हा वापस आल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतलाय.
गुरुचरण सिंगच्या प्रकरणात चाैकशी करण्यासाठी पोलिस थेट तारक मेहता का उल्टा चश्माच्या सेटवर देखील पोहचले होते. मात्र, आता अभिनेता सुखरूप आपल्या घरी आला आहे. तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने नुकताच मोठे भाष्य केले आहे.
गुरुचरण सिंग सुरक्षित वापस आल्यानंतर जेनिफर मिस्त्री म्हणाली की, खरोखरच ही खूप चांगली बातमी आहे. जवळपास एक महिन्यापासून तो बेपत्ता होता. आई वडिलांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वचजण यादरम्यान तणावात होते. मला हे माहिती होते की, तो नक्कीच वापस येईल.
माझ्या मनात होतेच की, तो धार्मिक यात्रेला वगैरे गेलेला असावा. मी खूप आनंदी आहे की, तो वापस आलाय. मला ही खात्री आहे की, त्याचेही पालक आनंदात असतील’. असं अभिनेत्री म्हणाली आहे. गुरूचरण सिंग याने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली होती.





